Type Here to Get Search Results !

भरदिवसा सराफा दुकानातून दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास

 भरदिवसा सराफा दुकानातून दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

हिंगणघाट पोलिसांची कारवाई; १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त


हिंगणघाट : शहरातील कारंजा चौक परिसरातील वर्मा बंधू ज्वेलर्स या सराफा दुकानातून भरदिवसा दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेणाऱ्या आरोपीला हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. मयुर मेघश्याम झिले (वय २८, रा. येरला, ता. हिंगणघाट) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या सोन्याच्या अंगठ्यांसह गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. वर्मा बंधू ज्वेलर्सचे मालक देवेंद्र शालीग्राम वर्मा यांच्या वडिलांची दुकानात उपस्थिती असताना एक अनोळखी व्यक्ती सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आली. त्याने दोन अंगठ्या बोटात घातल्यानंतर आणखी अंगठ्या दाखविण्यास सांगितले. दुकानदार दुसऱ्या अंगठ्या काढण्यासाठी वळल्याची संधी साधून आरोपीने दोन्ही अंगठ्या घेऊन पळ काढला.

याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६९२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोपेडच्या आधारे आरोपीचा शोध

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये आरोपी पळून जाताना दिसत होता; मात्र त्यानंतर त्याचा माग काढण्यात अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या मोपेडचा शोध घेत तिच्या मूळ मालकाकडून माहिती मिळविली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासाची दिशा निश्चित करत पोलिसांनी रिठे कॉलनी परिसरातून मयुर झिले याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून आठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, अंदाजे एक लाख ११ हजार रुपये किमतीच्या, तसेच सुमारे ८० हजार रुपये किमतीची होंडा अ‍ॅक्टिव्हा मोपेड (क्रमांक एमएच १२ एलजी ५९०१) जप्त करण्यात आली.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पळनाटे, पोलीस हवालदार श्रीकांत खडसे, दिनेश तुमाने, प्रवीण बोधाने, राकेश आष्टनकर तसेच पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, राजेंद्र ढगे आणि रोहित साठे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88