Type Here to Get Search Results !

मातोश्री महिला महाविद्यालयात वाणिज्य मॉडेल व पोस्टर प्रदर्शन

 

मातोश्री महिला महाविद्यालयात वाणिज्य मॉडेल व पोस्टर प्रदर्शन


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

बँकिंग, जीएसटी, शेअर बाजारासह डिजिटल पेमेंटचे आकर्षक मॉडेल्स सादर


हिंगणघाट, दि. २२ ऑक्टोबर : येथील मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित वाणिज्य मॉडेल व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. राजविलास कारमोरे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या डॉ. सपना जयस्वाल होत्या.

व्यावहारिक ज्ञानावर भर

आजच्या डिजिटल युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थिनींना व्यावहारिक ज्ञान मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा प्रदर्शनांमधून विद्यार्थिनींच्या कल्पकतेला वाव मिळतो आणि विषयांचे आकलन अधिक प्रभावीपणे होते, असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. सपना जयस्वाल यांनी केले.

प्रदर्शनात विद्यार्थिनींनी बँकिंग प्रणाली, वस्तू व सेवा कर (जीएसटी), करप्रणाली, शेअर बाजार, यूपीआय व डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स, बचत व गुंतवणूक तसेच स्टार्टअप इंडिया या विषयांवर आधारित आकर्षक त्रिमितीय (3D) मॉडेल्स आणि माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले. या माध्यमातून विद्यार्थिनींनी वाणिज्य विषयातील संकल्पना सोप्या व रंजक पद्धतीने मांडल्या.

यावेळी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. वैशाली तडस यांनी प्रदर्शनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. रोशनी नरवडे यांनी प्रास्ताविकातून प्रदर्शनामागील उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींनी ‘वाणिज्य संकल्प प्रतिज्ञा’ घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खुशबू कातुलवार यांनी केले, तर कु. स्नेहल वाढई यांनी आभार मानले. प्रदर्शनाला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या या उपक्रमातून शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले.

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88