Type Here to Get Search Results !

मातोश्री महिला महाविद्यालयाच्या जवेरीया शेखची ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड

 

मातोश्री महिला महाविद्यालयाच्या जवेरीया शेखची ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

आंतरविद्यापीठीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

हिंगणघाट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित आंतरविद्यापीठीय बॉक्सिंग स्पर्धेत मातोश्री महिला महाविद्यालयाची बी.एस्सी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी जवेरीया शेख हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या दैदीप्यमान यशाच्या जोरावर तिची ऑल इंडिया स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जवेरीया हिने बॉक्सिंग स्पर्धेत आपल्या कौशल्याची आणि जिद्दीची चमक दाखवत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्याविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर, संस्थेच्या सचिव डॉ. नयना तुळसकर आणि उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल यांनी तिचे अभिनंदन केले.

तसेच क्रीडा शिक्षिका भूमिका विरुळकर, क्रीडा विभागप्रमुख प्रा. मीनाक्षी जिडगीलवर, समिती सदस्य प्रा. अनिल मानकर, प्रा. मानसी चौधरी आणि प्रा. मयुरी धोंडे यांनीही जवेरीया हिचे कौतुक केले. आगामी ऑल इंडिया स्तरावरील स्पर्धेतही तिने उत्तम कामगिरी करावी, यासाठी मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या.

जवेरीया शेख हिच्या या यशामुळे मातोश्री महिला महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88