भारतीय जनता युवा मोर्चा व पॅसिफिक क्रिकेट क्लबचे वतीने "आमदार चषक"क्रिकेट स्पर्धांना सुरुवात..
आ. समिर कुणावार, ऍड. सुधीर कोठारी यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती..
दि.१२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेबर दरम्यान संपन्न होणाऱ्या अनेक नामवंत क्रिकेट संघ व खेळाडूंची हजेरी...
संपादक नईमुद्दीन शेख
हिंगणघाट,दि.१३
भारतीय जनता युवा मोर्चा तसेच पॅसिफिक क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दिवसरात्र ‘लेदर बॉल आमदार चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल दिनांक १२ रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी खेळाडूंशी संवाद साधला व त्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. तसेच युवकांमध्ये खिलाडूवृत्ती, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास प्रोत्साहन मिळते, असे मनोगत आ कुणावार यांनी व्यक्त केले.
स्पर्धेचे भव्य आयोजन केल्याबद्दल क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व संघांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
काल दिनांक १२ रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याला
कार्यसम्राट आमदार समीर कुणावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. सुधीर कोठारी यांचेसह गिमा टेक्सटाइलचे प्रशांतबाबू मोहता, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर,भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाने, भाजपा विधानसभा प्रमुख संजय डेहने, डॉ उमेश तुळसकर , हिंगणघाट नगरपालिकेचे उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, शाकीर खान पठाण,स्टार प्रचारक राकेश शर्मा, न. प. स्वास्थ्य सभापती संजय माडे, नगरसेवक बंटी वाघमारे ,भाजपा ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद विटाळे , नगरसेवक दिनेश वर्मा, कैलास भोयर, नगरसेवक धनंजय बकाने, नगरसेवक रवी रोहनकर, विश्व हिंदू परिषदेचे शरद कोणप्रतिवार, देवा वाघमारे , शंकर मुंजेवार, रितेश बुलानी , विवेक गिरधर, हिंगणघाट शहराचे ठाणेदार अनिल राऊत इत्यादी मान्यवर सहित असंख्य महिला आणि पुरुष मंडळी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments