Type Here to Get Search Results !

इतवारा बाजारात चाकू घेऊन दहशत; एकाला अटक

इतवारा बाजारात चाकू घेऊन दहशत; एकाला अटक


संपादक नईमुद्दीन शेख

वर्धा शहर डी.बी. पथकाची कारवाई; धारदार चाकू जप्त

वर्धा : शहरातील इतवारा बाजार परिसरात हातात धारदार चाकू घेऊन आरडाओरड करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या इसमाला वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने (डी.बी.) ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ३०० रुपये किमतीचा धारदार चाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्धा शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक नियमित गस्तीवर असताना इतवारा बाजार परिसरात एका इसमाकडे धारदार चाकू असून तो आरडाओरड करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची दखल घेत पथकाने पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संबंधित इसम हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्परतेने त्याला ताब्यात घेतले.
अंगझडतीदरम्यान त्याच्याकडे धारदार चाकू आढळून आला. पंचांसमक्ष हा चाकू जप्त करण्यात आला. विश्वास नंदकिशोर पसारी (रा. महाकाली डॅम, ता. आर्वी, जि. वर्धा) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अन्वये वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव बागमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतुरकर यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, अभिजीत वाघमारे तसेच पोलीस अंमलदार रंजित भुरसे व अमोल सालवन यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88