आज दिनांक 5/1/2026 ला सिंदी रेल्वे नगरपरिषद येथे भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. राणी स्नेहल कलोडे यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण व गौरवशाली वातावरणात पार पडले.
जनतेच्या विश्वासावर आणि लोकशाही प्रक्रियेतून मिळालेल्या विजयाचा हा क्षण शहरासाठी अभिमानास्पद ठरला.या सोहळ्यावेळी उपस्थित मा ना श्री.कार्यसम्राट आमदार समीर कुन्नावार साहेब,हिंगणघाट न पा नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुडसकर व मान्यवर,पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक–नगरसेविका, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे स्वागत व अभिनंदन केले. पदग्रहण करताना सौ. राणी स्नेहल कलोडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.सिंदी रेल्वे शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच महिला व युवक सक्षमीकरण या क्षेत्रांत ठोस व परिणामकारक काम करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. “विकास, विश्वास आणि सेवा” या मूल्यांवर आधारित प्रशासन देण्याचा निर्धार या पदग्रहण सोहळ्यातून स्पष्टपणे दिसून आला.हा पदग्रहण सोहळा म्हणजे जनतेच्या अपेक्षांचा सन्मान, लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीची जाणीव आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठीची नवी सुरुवात ठरली.सिंदी रेल्वे नगरपरिषदेला सक्षम, गतिमान आणि विकासाभिमुख नेतृत्व लाभल्याचा विश्वास यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. उपसंपादक फैमोद्दीन शेख, ✍️✍️

Post a Comment
0 Comments