Type Here to Get Search Results !

पोलीस वर्धापन दिन निमित्ताने पोलीस प्रदर्शनि चे पोलीस मुख्यालंय येथे यशस्वी आयोजन

 *पोलीस वर्धापन दिन निमित्ताने पोलीस प्रदर्शनि चे पोलीस मुख्यालंय येथे यशस्वी आयोजन  17 शाळा कॉलेज व 1500 विद्यार्थी यांनी भेटी देवून सखोल माहिती घेतली **


 दि. 02.जानेवारी हा पोलीस वर्धापन दिन होता त्या अनुषंघाने पोलीस मुख्यालय वर्धा येथे पोलीस प्रदर्शनी चे आयोजन मा, पोलीस अधीक्षक  सौरभकुमार अग्रवाल सर.अपर पोलीस  अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सर यांच्या हस्ते करण्यात आले, पोलीस प्रदर्शनी मध्ये पोलीस मुख्यालंय मधील ग्राउंडवर पोलीस विभागामधील न्यायसाहाय्य्क विज्ञान विभाग, वायरलेस विभाग, बॉम्ब शोधक व नाशक विभाग, श्वान पथक, दामिनी पथक, अग्नीशस्त्र,  इतर शस्त्रे, सायबर विभाग ऑनलाईन फ्रॉड बाबत, मादक गुंगीकारक पदार्थ विभाग, डायल 112, ट्रॅफिक विभाग, पोलीस बेंड पथक  या सर्व  विभागाचे साहित्य सामुग्री व कसे कामकाज करतात याबाबत सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक हे शालेय व कॉलेज मधील  विध्यार्थी यांना पोलिसांनकडून देण्यात आले 


आज मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांनच्या शुभ हस्ते व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सर यांच्या उपस्थितीत सदर   प्रदरशीनी  चे उदघाटन हे करण्यात आले, 

डॉग स्कोड कडून अमली पदार्थ शोध, स्फ़ोटक पदार्थ शोध कार्यवाही प्रात्यक्षिक दाखविले श्वान जॉनी याने सेल्यूट, वेलकम, आदेश पालन चे प्रात्यक्षिक, तसेच डाबरमेन  डॉग नि रनिंग उंच उडी लांब उडी मारून अडथळे कसे पार करतात ते नमुने दाखविले 

आर्म प्रदर्शनी मध्ये  पोलीस विभाग वापरणारे अग्निशस्त्र, पिस्टोल रीवहोलव्हर, Ak 47.Ak 56, SLR, दारुगोला ग्रीनेड, बाबत माहिती देण्यात आली, 

BDDS बॉम्ब शोधक नाशक विभाग यांच्याकडून


स्फ़ोटक पदार्थ कसे शोध घेतात VIP सुरक्षा कशी करतात, गाडी, घर कशी झडती  घेतात, याबाबत विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले 

वाहतूक नियंत्रण शाखे कडून हेल्मेट वापर करणे, सिग्नल नियम, ब्रिथ आणलयझर कसे दारू पिलेवर शोध घेतात, ई चलणं  मशीन कसे  काम करतात, 108.अंबुलेन्स  112 पोलीस निशुल्क फोन सेवा नंबर याबाबत विद्यार्थी यांना माहिती देण्यात आली, राखीव पोलीस निरीक्षक माजीद शेख  यांनी ही सर्व विद्यार्थी यांना पोलीस मुख्यालय येथील कामकाज बाबत माहिती दिली, विद्यार्थी यांना बिस्कीट पाणी व्यवस्था ही पुरविण्यात आली 


विद्यार्थी यांनी ही या पोलीस प्रदर्शीनी चे लाभ घेवून पोलिसांच्या कामाचे टाळ्या वाजवून अभिनन्दन केले व शुभेच्छा आपल्या मनोगत व्यक्त करताना दिल्यात सर्व शाळे नि ही पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले 

उद्या दि. 07/01/26 रोजी ही सकाळी 09/00 ते  दुपारी 03/00 वा पर्यंत ही पोलीस प्रदर्शनी  ही सर्वांनकरीता उपलब्ध आहे आपण पोलीस मुख्यालंय येथे येऊन लाभ घेवू शेकतात  सदर कार्यक्रमात SDPO श्री मकेश्वर सर, LCB PI विनोद चौधरी सायबर API चिलंगे, महिला सेल सौं आरती उघडे यांनी ही विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.

स्थळ पोलीस मुख्यालय वर्धा.                                                                                                                                                हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️ ✍️

Post a Comment

0 Comments