Type Here to Get Search Results !

व्याघ्र प्रकल्पातून पर्यंटनासोबतच व्यवसायाला चालना मिळेल* *- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर* * बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी व ढगा सफारी गेटचे उद्घाटन*

 


*बोर व्याघ्र प्रकल्पातून पर्यंटनासोबतच व्यवसायाला चालना मिळेल*

                        *- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर*

* बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी व ढगा सफारी गेटचे उद्घाटन*

वर्धा, दि. 18 (जिमाका) : बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यंटकांना एक चांगली पर्यंटनाची संधी मिळेल. जैवविविधतेचे रक्षण होण्यासोबतच व्यवसायाला चालना मिळेल. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी व ढगा सफारी गेटचे उद्घाटन आज पालकमंत्र्याचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक हरविर सिंग, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक अक्षय गजभिये, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, बफर क्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रय लोंढे, संजय गाते, सुधीर दिवे आदी उपस्थित होते.

बोर व्याघ्र प्रकल्पासाठी नवरगाव या गावाचे ज्या पध्दतीने पुनर्वसन करण्यात आले होते, त्याच पध्दतीने बफर क्षेत्रात येणाऱ्या मेटहिरजी, उमरविहिरी, येणीदोडका, मरकसूर व गरमसूर गावाचे पुनर्वसन करण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावाच्या पुनवर्सनाच्या मंजूरीसह 100 कोटी रुपये पुनर्वसनासाठी मंजूर केले आहे. या गावांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करुन देण्यासोबत येथील नागरिकांना प्रकल्पामध्ये उद्योगाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. 


पर्यटनाच्यादृष्टीने वर्धेकरांसाठी एक चांगली सुरुवात असून यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. बोर व्याघ्र प्रकल्पासोबतच कौंडण्यपूर, सेवाग्राम यासारख्या पर्यटन क्षेत्राचा सुध्दा विकास करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे‌. व्याघ्र प्रकल्पाच्या आजुबाजुच्या परिसरातील शेत जमिनी वन्यप्राण्यांमुळे पडित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वन विभागाने नियोजन करण्याची गरज असल्याचे खासदार अमर काळे म्हणाले. 


बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. वन विभागाने पर्यावरणाचे रक्षण करतांना नागरिकांचे रक्षण करणे तेवढेच गरजेचे आहे. यासाठी पशुपालकांच्या चराईचा व पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वन विभागाने नियोजन करावे, असे आ.सुमित वानखेडे म्हणाले. 


बोर अभयारण्याच्या कोर क्षेत्रामध्ये पुर्वी बोर व अडेगाव हे दोन गेट होते आता बफर झोन झाल्यामुळे रहाटी व ढगा हे गेट सुरु करण्यात आले आहे. यामुळे आता पर्यटकांना पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. सोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संघी उपलब्ध होणार आहे. वाढीव बफर क्षेत्रातील पुनर्वसीत करण्यात येणाऱ्या पाच गावाचा विकास करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे श्रीनिवास रेड्डी म्हणाले. 


सुरुवातीला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते ढगा येथील व त्यानंतर रहाटी येथील सफारी गेटचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी अभयारण्याच्या सफारीचा सुध्दा आनंद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी केले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट, बोर व्याघ्र प्रकल्पातील सर्व वन परिक्षेत्र अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे, पिपल्स फॉर ॲनिमलचे आशिष गोस्वामी, वन्यजीव प्रेमी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Post a Comment

0 Comments