Type Here to Get Search Results !

मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*

         

मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा


                   वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख                                      

 मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्या विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर, उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल, विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा. नितेश रोडे मराठी विभाग प्रमुख प्रा. अजय बिरे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट  गीत सादर केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. अजय बिरे यांनी मराठी भाषेची उत्पती व मराठी भाषेची ग्रंथ संपदा याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नितेश रोडे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची कारणे काय? याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष  डॉ. उमेश तुळसकर यांनी मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. सपना जयस्वाल यांनी कवितेच्या माध्यमातून मराठी भाषेची महिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. पूनम बुरीले यांनी केले. तर क प्रा. संगीता लांडगे यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments