वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
हिंगणघाट येथील मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी *जागतिक रेडिओ दिन* उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना रेडिओचे महत्त्व कळावे, विविधता आणि माहिती प्रसारातील भूमिका याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सपना जयस्वाल तसेच मार्गदर्शक म्हणून विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शितल कारमोरे, बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व रेडिओचे जनक मार्कोनी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेडिओचे समाजप्रबोधनातील योगदान, माहितीचे प्रभावी माध्यम म्हणून असलेले महत्त्व आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही रेडिओची उपयुक्तता याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना रेडिओ दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्राची कामडी यांनी केले, तर सूत्रसंचालन कु. साक्षी सुरशे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन कु. पोर्णिमा गवळी हिने केले.
या कार्यक्रमास विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थिनींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Post a Comment
0 Comments