हिंगणघाट पोलिसांची होळीपूर्व धडक कारवाई; १ लाख ३ हजारांचा अवैध दारू साठा जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखप्रतिनिधी हिंगणघाट : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत तब्बल १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दारू साठा जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत मूखबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार नागरी रोडवर नाकाबंदी करण्यात आली. त्या वेळी दुचाकी मोपेड क्रमांक MH 32 AW 2465 थांबवून तपासणी केली असता चालक सुजल विनोद कडू (वय १८, रा. तहसील वॉर्ड, हिंगणघाट) याच्या ताब्यातून प्रीमियम कंपनीच्या देशी दारूच्या १५० प्लास्टिक शिश्या (किंमत १५,००० रुपये) व डेस्टिनी प्राईम कंपनीची मोपेड (किंमत ७०,००० रुपये) असा एकूण ८५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत सोनू उर्फ प्रवीण ज्ञानेश्वर भांगे (वय ३३, रा. डांगरी वॉर्ड, हिंगणघाट) याच्या घरझडतीत रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूचे दोन लिटर क्षमतेचे पाच बंपर (किंमत १५,००० रुपये) जप्त करण्यात आले.
तिसऱ्या कारवाईत संत चोखोबा वॉर्ड येथील ओम सुपारे याच्याकडून देशी दारूच्या रॉकेट कंपनीच्या ३० शिश्या (किंमत ३,००० रुपये) जप्त करण्यात आल्या.
तीन्ही कारवायांमध्ये एकूण १,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकाचे इन्चार्ज सपोनि पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे व रोहित साठे यांनी पार पाडली.
हिंगणघाट पोलिसांची होळीपूर्व धडक कारवाई; १ लाख ३ हजारांचा अवैध दारू साठा जप्त
March 01, 2026
0
Tags

Post a Comment
0 Comments