Type Here to Get Search Results !

प्रभागातील पाणी समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा प्रहारचे नगरसेवक सूरज कुबडे यांचा इशारा*

 *प्रभागातील पाणी समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा प्रहारचे नगरसेवक सूरज कुबडे यांचा इशारा* 

हिंगणघाट 


            वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

    शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील नळाच्या लाईनला अत्यन्त कमी दाबाने पाणी पुरवठा होतं असल्याने प्रभागातील अनेक घरी पाण्याचा पुरवठा होत नसल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जनतेला पाण्याच्या समस्याचा सामना करावा लागतं असून ही समस्या त्वरित न सुटल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारचे नगरसेवक सूरज कुबडे यांनी आज दि. 5 मार्चला नप अध्यक्षा नयना तुळसकर यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.

   या संदर्भात निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार,नप प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही यां प्रभागातील पाण्याची समस्या सुटत नसल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होतं आहे. नप च्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ जलवाहिनीची तपासणी करून पाणीपुरवठ्याचा दाब वाढविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी या निवेदनातून  यां प्रभागातील नागरिकांच्या वतीने अध्यक्षाना नगरसेवक सूरज कुबडे यांनी प्रत्यक्ष भेटून केली आहे.

     प्रभागातील पाण्याच्या व अन्य समस्या बाबतीत मागील पाच वर्षांपासून सूरज कुबडे हे अतिशय आक्रमक आहेत. यापूर्वी त्यांनी खोल खड्ड्यात बसून केलेले अभिनव आंदोलन चांगलेच गाजले होते. व त्या आंदोलनाची तत्कालीन नप प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती.

     आता नप मध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी आले असून यावेळी यां प्रभागातील पाणी समस्या त्वरित निकाली निघावी अशी प्रभागातील जनतेची नप प्रशासनाकडून अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments