वेणा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्याचे कामाची आ. कुणावार यांनी केली प्रत्यक्ष पाहणी.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख६० कोटीच्या बंधारा निर्मितीनंतर पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार..
हिंगणघाट,दि.१४ मार्च
वणा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज दि.१४ रोजी विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह या नियोजित स्थळी भेट दिली.
यावेळी या नियोजित बंधाऱ्याचे कामाविषयी सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज्य शासनाकडून सुमारे ६० कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत या बंधाऱ्याचे काम मंजूर करण्यात आले असून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या मंजुरी करिता आ. समिर कुणावार यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यानेच हा बंधारा लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचे दिसून येत आहे.
हिंगणघाट शहरातील नागरिकांना भविष्यात मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा, तसेच शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा बंधारा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा बंधारा अस्तित्वात आल्यानंतर हिंगणघाटकरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या काळात हिंगणघाट शहराला चोवीस तास मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचा आ.कुणावार यांचा उद्देश असून शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे.
यावेळी अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता कायम राखत नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. बंधाऱ्याचे काम तातडीने आणि प्रभावीपणे पूर्ण होऊन त्याचा लाभ हिंगणघाट शहरातील नागरिकांना लवकरात लवकर मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहनही आ. कुणावार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
सदर बंधारा पाहणी दरम्यान आमदार समीर कुणावार यांचेसह हिंगणघाटच्या नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुळसकर , नगरपरिषद उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, प्रा. उमेश तुळसकर , न. प.पाणीपुरवठा सभापती रवीला आखाडे, नगरसेवक बंटी वाघमारे ,न. प. बांधकाम सभापती चंदू माळवे , नगरपरिषद गटनेता भूषण पिसे, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, तहसीलदार योगेश शिंदे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पाटबंधारे विभागाच्या अभियंता प्रांजली टोंगसे , पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता घुमडे साहेब, नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोशन कुमरे,पियुष इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे जनरल मॅनेजर विशाल गेडाम, तलाठी अहमद सय्यद, नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे दत्ता गारपल्लीवार, ठाणेदार अनिल राऊत, सहायक पोलिस निरीक्षक मुंढे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हिंगणघाट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अशा महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत असून या प्रकल्पामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.
वेणा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्याचे कामाची आ. कुणावार यांनी केली प्रत्यक्ष पाहणी.
March 14, 2026
0
Tags



Post a Comment
0 Comments