हिंगणघाटत देशी दारूची वाहतूक करताना आरोपी जप्त; ४० शिश्या देशी मद्य जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
हिंगणघाट – दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.४० वाजता हिंगणघाट पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान देशी दारू वाहतूक करत असलेल्या आरोपीवर कारवाई केली. हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या 0384/2026 अप.क्र. अंतर्गत विक्रम मारोतराव वाढई (वय ४८, रा. हनुमान वार्ड) हा काळी रंगाच्या टीव्हीएस ज्युपीटर मोपेड वाहन क्रमांक MH 32 AR 2670 वर सापळ्यात अडकल्याचे निदर्शनास आले.
सदर वाहनाच्या डिक्कीमध्ये राँकेट कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या ४० शिश्या आढळून आल्या. प्रत्येक शिशीची किंमत १२० रू असून, एकूण ४,८०० रू किमतीचा माल जप्त करण्यात आला. या घटनेची नोंद दारूबंदी कायद्याअंतर्गत करण्यात आली.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, मा. पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पद्ममाकर मुंडे, डि.बी. पथकाचे स.फौ रहीम शेख, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे, पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.
हिंगणघाटत देशी दारूची वाहतूक करताना आरोपी जप्त; ४० शिश्या देशी मद्य जप्त
March 15, 2026
0
Tags

Post a Comment
0 Comments