Type Here to Get Search Results !

पटवारी कॉलनी ते ओस्तवाल दाल मिल पर्यंत मंजूर असलेला रस्ता तात्काळ सुरू अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन* *प्रहार जिल्हाध्यक्ष सूरज कुबडे यांचा इशारा*

 *

पटवारी कॉलनी ते ओस्तवाल दाल मिल पर्यंत मंजूर असलेला रस्ता तात्काळ सुरू अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन*

*प्रहार जिल्हाध्यक्ष सूरज कुबडे यांचा इशारा*


    

हिंगणघाट            वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख


हिंगणघाट शहरातील पटवारी कॉलनी ते ओस्तवाल दाल मिल पर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर झालेला असूनही अद्याप त्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.या रस्त्याचे काम त्वरित सुरु न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सूरज कुबडे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनातून दिलेला आहे.

निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार,

सदर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शासनाकडून रस्ता मंजूर असतानाही काम सुरू न होणे हे अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून सूरज कुबडे यांनी दिलेला आहे.निवेदन देताना  माही लोहकरे, दीपाली थुल , प्रीती येळणे, चिकनकर, सुवर्णा कवाडे, थूल आदींचा समावेश होता

Post a Comment

0 Comments