हिंगणघाट पोलिसांची दारूबंदी कायद्यान्वये मोठी कारवाई, विदेशी दारू सह 1.21 लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
दि 24.07.2026 रोजी पो.स्टे. हिंगणघाट पथकातील पोलीस हवालदार, प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, पोलीस अमदार सागर समृतवार, अमोल गीते , यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की मौजा जाम कडून हिंगणघाट गावाकडे ब्रम्हा पाटील राहणार चाकुर ता.समुद्रपूर हा TVS जुपिटर मोपेड गाडी क्रमांक MH 40 DK 8157 ने विदेशी दारूची वाहतूक करीत आहे. अशा माहितीवरून दोन पंचा समक्ष रायडग हॉटेल जवळील NH 44 सर्विस रोडवर जाऊन थांबून पाहणी केली असता एक व्यक्ती हा रीमडोह गावाकडून मिया रंगाची मोपेड गाडी घेऊन येताना दिसला त्यास थांबण्याचा इशारा दिला असता त्याने त्याचे वाहन काही अंतरावर थांबविले पंचा समक्ष मोपेड गाडीची पाहणी केली असता गाडीच्या समोर पांढऱ्या रंगाच्या चुंगडी मध्ये व डिक्की मध्ये 1)रॉयल्स स्टांग कंपनी च्या 180 एम. एल. विदेशी दारू ने भरून असलेल्या 30 निपा किंमत 12000 रु 2) ओ.सी.ब्ल्यू कंपनीच्या 180 एम. एल. विदेशी दारू ने भरून असलेल्या 30 निपा किंमत 10500 रु 3) ऑल सीझन कंपनीच्या 180 एम. एल. विदेशी दारू ने भरून असलेल्या 15 निपा किंमत 5750 रु 4) कासबर्ग कंपनीचे 8 बियर चे टीनाचे डब्बे की. 3200 रु व TVS कंपनीची मोपेड गाडी क्रमांक MH 40 DK 8157 ची किंमत 90000 हजार रु पंचा समक्ष जप्ती पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून आरोपी ब्रह्मा पाटील याचे ताब्यातून एकुण जु किं 121650 /रू चा मुद्दे माल जप्त करण्यात आला असून आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल सा. मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे सा. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुशिलकुमार नायक सा यांचे मार्गदर्शनात मा.पोलीस निरीक्षक अनिल राउत सा.याचे निर्देशाप्रमाणे, पोलीस हवालदार प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, जगदीश चव्हाण , पोलिस अंमलदार सागर समृतवार, अमोल गीते यांनी केली .

Post a Comment
0 Comments