Type Here to Get Search Results !

हिंगणघाट पोलिसांची दारूबंदीची धडक कारवाई, 2.88 लाखांचा दारू व वाहनासह मुद्देमाल जप्त, 3 आरोपींविरुद्ध गुन्हा

 हिंगणघाट पोलिसांची दारूबंदीची धडक कारवाई, 2.88 लाखांचा दारू व वाहनासह मुद्देमाल जप्त, 3 आरोपींविरुद्ध गुन्हा


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

दिनांक 26/07/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार मा. वरीष्ठाचे आदेशाने पोस्टे परिसरात प्रो.रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मौजा लाडकी ते बुरकोणी रोडने दोन मोटार सायकलवर वेगवेगळे दोन इसम नामे बबन थुल व भगवान काळे हे देशी दारूचा माल वाहतूक करतांना मिळून आल्याने बबन थुल याचे ताब्यातून 1) रॉकेट कंपनीचे 90 मिलीच्या देशी दारूने भरलेल्या सिलबंद 100 प्लास्टीक शिश्या प्रत्येकी शिशी किं 120 रू. प्रमाने 12,000 रू. 2) एक हिरो कंपनीची पॅशन प्रो प्लस काळया रंगाची क्र एमएच 34 एएल 9742 मोटर सायकल कि. 90,000 रू असा जु.कि. 1,02,000 रू चा माल व भगवान काळे याचे ताब्यातून 1) रॉकेट कंपनीचे 90 मिलीच्या देषी दारूच्या संत्रा 100 प्लास्टीक शिश्या प्रती शिशी 120 रू. प्रमाने 12,000 रू. 2) एक हिरो कंपनीची स्प्लेन्डर प्लस काळया रंगाची क्र एमएच 34 एजे 7509 मोटर सायकल कि. 70,000 रू असा जु.कि. 82,000 रू चा माल मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथे राहनारा संदीप चाफले हा मोपेड वाहनाचे डिक्कीमध्ये विदेशी दारू बाळगून विक्री करतांना मिळून आल्याने त्याचे ताब्यातूह 1) जुने वापरते हिरो कंपनीची पांढ-या रंगाची डेस्टनी मोपेड गाडी क्रमांक MH 32 एवाय 3326 असून किं. 1,00,000 रू सदर मोपेड वाहनाचे डिक्कीमध्ये एका टिफीन बँगमध्ये 2) 180 मिलीच्या राँयल स्टँग कपंनीच्या विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद 6 शिश्या प्रती 400 रू प्रमाने 2400 रू 3) 180 मिलीच्या राँयल चँलेजर्स कपंनीच्या विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद 4 शिश्या प्रती 400 रू प्रमाने 1600 रू असा जु.किं. 1,04,000 रू चा माल जप्त करण्यात आला. अशा एकूण तीन वेगवेगळ्या कारवाईमध्ये एकूण जु.किं. 2,88,000 रू चा माल जप्त करून सदर आरोपीतांविरूध्द दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक साहेब सा. मा.पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. हिंगणघाट, यांचे आदेशाने पो.उपनि महेश इटकल, पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, प्रवीण बोधणे,पो.ना राजेश शेंडे, पोशी मंगेश वाघमारे,पोशी आशिष नेवारे, पो.शि. रोहीत साठे, यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments