Type Here to Get Search Results !

हिंगणघाट | विद्या विकास स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडीचा धुमधडाका, चिमुकल्यांनी जिंकली मन

 

हिंगणघाट | विद्या विकास स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडीचा धुमधडाका, चिमुकल्यांनी जिंकली मन 


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची फुले, दहीहंडीच्या जल्लोषात विद्यार्थ्यांची धमाल


हिंगणघाट, दि. ५ सप्टेंबर : विद्या विकास प्ले स्कूल अँड किंडर गार्डन तसेच विद्या विकास हायस्कूल हिंगणघाटये थे शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितेश रोडे होते. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे, गीते, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांचा पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्रे देऊन सन्मान केला.


यावेळी अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक श्री. नितेश रोडे यांनी शिक्षकांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले.


यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा आणि गोप-गोपिकांच्या वेशभूषेत सहभाग घेत वातावरण भक्तिमय केले. पारंपरिक गीते, नृत्य आणि दहीहंडी फोडण्याच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लहानग्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळविली.


शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुरूजनांप्रती आदर व्यक्त करताना आणि दहीहंडीच्या जल्लोषात सहभागी होताना विद्यार्थ्यांनी आनंदाची अनोखी मेजवानी अनुभवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Post a Comment

0 Comments