मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; संशयित आरोपी अटकेत
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
वर्धा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाची कामगिरी; ७५ हजारांची मोटारसायकल जप्त
वर्धा : डागा रुग्णालय परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ७५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादाब मन्सुरी इकबाल मन्सुरी (वय २३, रा. सेलू, जि. वर्धा) हे १० सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ वाजताच्या दरम्यान कामानिमित्त डागा रुग्णालय, वर्धा येथे गेले होते. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसरात उभी केलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर एक्सटीईसी मोटारसायकल (क्रमांक एमएच ३२ एव्ही ०४२७) अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी तक्रारदाराच्या तोंडी रिपोर्टवरून वर्धा शहर पोलिस ठाण्यात अप. क्र. १५१०/२०२६, कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी विशेष पथक नियुक्त केले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान महेश अंबादास वांढरे (वय ४२, रा. वालदूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा; सध्या काटवे यांच्या घरी किरायाने, गोंड प्लॉट, केजाजी चौक, वर्धा) याचे नाव निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाकडून पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्याच्याकडून तक्रारदाराच्या मालकीची चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर एक्सटीईसी मोटारसायकल जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. शरद गायकवाड, पोहवा प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, महेंद्र पाटील, पोलिस अंमलदार वैभव जाधव आणि श्रावण पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा प्रशांत वंजारी करीत असून, तपासादरम्यान आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments