Type Here to Get Search Results !

अखेर आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नांना यश; *सिंदी रेल्वेला अप्पर तहसीलचा दर्जा शासन निर्णय जाहीर*

 

अखेर आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नांना यश; 

 *सिंदी रेल्वेला अप्पर तहसीलचा दर्जा शासन निर्णय जाहीर* 


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया   

सिंदी रेल्वे : सिंदी रेल्वे शहरासह परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची अप्पर तहसील कार्यालयाची मागणी अखेर मार्गी लागली असून दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी सिंदी रेल्वे ला अप्पर तहसील कार्यालय मंजूर केल्याचा शासन निर्णय जाहीर झाला असून आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.सिंदी रेल्वेला अप्पर तहसीलचा दर्जा मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

मंगळवार, 22 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथील मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय जाहीर केला असून आमदार समीर कुणावार यांनी याबाबत माहिती दिली आहे.


यावेळी आमदार समीर कुणावार यांनी सिंदी रेल्वे परिसरातील नागरिकांकडून मागील अनेक वर्षांपासून अप्पर तहसील कार्यालयाची मागणी केली जात असल्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते हे विशेष.

 सिंदी रेल्वेला अप्पर तहसीलचा दर्जा मिळावा ही सिंदी रेल्वे मंडळातील जनतेची सातत्यपूर्ण मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सिंदी रेल्वे हे परिसरातील महत्त्वाचे शहर असून अप्पर तहसील कार्यालय झाल्यास नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच विविध गावांतील जनतेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण मागणीला  सकारात्मक प्रतिसाद देत सिंदी रेल्वेला अप्पर तहसीलचा दर्जा दिल्याने समस्त शहरवासीयांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार समीर कुणावार यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments