Type Here to Get Search Results !

हिंगणघाट पोलिसांची दारूबंदी कायद्यान्वये कारवाई; ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

 

हिंगणघाट पोलिसांची दारूबंदी कायद्यान्वये कारवाई; ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया  

हिंगणघाट : कॉटन मार्केटच्या मागील बाजूस झऱ्या मंदिराच्या मागे झाडाझुडपात गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चा मोहा सडवा तयार केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पाच प्लास्टिक ड्रममधील एकूण ६६० लिटर कच्चा मोहा सडवा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत ४७ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या पथकाला मुखबिरामार्फत राजू खंगार (रा. मुजुमदार वॉर्ड, हिंगणघाट) हा झऱ्या मंदिराच्या मागील झाडाझुडपात गावठी मोहा दारू तयार करण्यासाठी कच्चा मोहा सडवा ड्रममध्ये तयार करीत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिस आल्याची चाहूल लागताच संशयित राजू खंगार घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता पाच प्लास्टिक ड्रममध्ये ६६० लिटर कच्चा मोहा सडवा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पसार संशयित राजू खंगार याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार संशयिताचा शोध सुरू आहे.

पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या निर्देशानुसार प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, अमोल गित्ते आणि सागर सामृतवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88