पितृपक्षात नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभाव
गरजूंना नारायण भोज; ‘नरसेवा हीच नारायण सेवा’चा संदेश
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
हिंगणघाट : पितृपक्षाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून नारायण सेवा मित्र परिवार, हिंगणघाटच्या वतीने रविवारी जलाराम मंदिर परिसरात गरजू नागरिकांसाठी नारायण भोजचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गरजू नागरिक व कुटुंबीयांना प्रेमपूर्वक भोजन देत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करण्यासोबतच समाजातील गरजू घटकांची सेवा करण्याची परंपरा जपण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भोजनासाठी आलेल्या नागरिकांचे आपुलकीने स्वागत करून त्यांना भोजन देण्यात आले. या उपक्रमातून माणुसकी, सामाजिक संवेदना आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या सेवाकार्यात महेश दीक्षित, लक्ष्मण डहाके, विपिन खिवसरा, पराग मुडे, ॲड. विशाल जैन, दामोदर चंदनखेडे, रूपचंद हेमनानी, मनोज सिंघवी, ताराचंद सिंघवी, चंद्रकांत रोहनकर, दुर्गाप्रसाद यादव, विजय गुप्ता, दिनेश धारकर, महेंद्र मुनोत, राधेश्याम श्रीवास, सुंदरभाई बसंतानी, संतोष बोधानी, रवि दुशेट्टीवार, चंद्रकांत कामडी, सुनील अलोनी, अमोल भुतडा, सूर्यकांत ठाकरे, विलास जाधव, यशवंत गढवार, मनोज मैद, नानेश्वर, लतिका बेलेकर, भाग्यश्री खियानी, अनुराधा मोटवानी, वीरश्री मुडे, अलका रानपारा, किरण अग्रवाल यांच्यासह नारायण सेवा मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. ‘नरसेवा हीच नारायण सेवा’ या भावनेतून गरजूंच्या मदतीसाठी कार्यरत राहणे हे परिवाराचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सदस्यांनी सांगितले. भविष्यातही समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी विविध सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment
0 Comments