हिंगणघातमध्ये खळबळ: मध्यरात्री तीनचाकी ऑटो पेटवला; एसटीपी प्लांटजवळील घटना
हिंगणघाट |
संपादक नईमुद्दीन शेख
शहरातील खंडोबा वार्ड परिसरातील बिडकर मंदिरामागे, एसटीपी (STP) प्लांटकडे जाणाऱ्या मार्गावर एका तीनचाकी ऑटोला (स्कूटर ऑटो) अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्रीच्या सुमारास आग लावून जाळल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. ही घटना आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी उघड झाली असून, ऑटो जळून पूर्णपणे खाक झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच ३९ ई १४०४ (MH 39 E 1404) क्रमांकाचा हा तीनचाकी ऑटो शास्त्री वार्डातील रहिवाशाचा असल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी नेहमीप्रमाणे याच मार्गावरून फिरण्यासाठी (वॉकसाठी) गेलेल्या काही नागरिकांना हा ऑटो जळत्या अवस्थेत किंवा जळालेला आढळला. त्यांनी तात्काळ याची माहिती स्थानिक नागरिकांना दिली.
वैयक्तिक वादातून घटना घडल्याचा संशय
घटनास्थळावरील प्राथमिक परिस्थिती पाहता, ही दुर्घटना नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेले कृत्य असल्याचे बोलले जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार वैयक्तिक वादातून किंवा पूर्वद्वेषातून घडला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास ऑटो पेटवून दिल्याची चर्चा परिसरात सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसranतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवण्याचे काम सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Post a Comment
0 Comments