*
हिंगणघाट : जिल्हा परिषद शाळा वेळा व वाघोली येथे पोलिसांचा संवाद उपक्रम, विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व सुरक्षेबाबत मार्गदर्शन*
संपादक नईमुद्दीन शेख
*हिंगणघाट पोलिसांचा विद्यार्थ्यांशी संवाद; सायबर गुन्हे, महिला सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती*
*हिंगणघाट :* पोलीस स्टेशन हिंगणघाट अंतर्गत आज दि. २८/१०/२०२६ रोजी दुपारी २.०० ते २.३० वाजता जिल्हा परिषद शाळा वेळा आणि ज्ञानदीप विद्यानिकेतन कॉन्व्हेंट, वाघोली येथे 'संवाद' उपक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस दीदी, पोलीस काका संकल्पना, सायबर गुन्हे व फसवणूक, अमली पदार्थ विरोधी अभियान, विद्यार्थिनींची सुरक्षा व छेडछाड प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना महत्वाच्या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती देण्यात आली -
*सायबर हेल्पलाइन - 1930, आपत्कालीन मदत - डायल 112, चाइल्ड हेल्पलाइन - 1098 आणि महिला हेल्पलाइन - 1091.*
यासोबतच वाहतूक नियमांचे पालन आणि दामिनी पथकाच्या कार्याबाबतही माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा जनजागृती कार्यक्रम ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली HC प्रविण बोधाने आणि स्वप्निल जीवने यांनी घेतला.


Post a Comment
0 Comments