Type Here to Get Search Results !

हिंगणघाटात ऑटो चोरून जाळला; नागपुरातून चार आरोपींना अटक

 

हिंगणघाटात ऑटो चोरून जाळला; नागपुरातून चार आरोपींना अटक


 संपादक नईमुद्दीन  शेख 

डी.बी. पथकाची कारवाई; एक लाख रुपये किमतीचा ऑटो जाळल्याची कबुली


हिंगणघाट : शहरातील आंबेडकर चौकातून बजाज कंपनीचा ऑटो चोरून नेल्यानंतर डंकीन रोडवर जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नागपूर येथून चार आरोपींना ताब्यात घेतले.

शास्त्री वार्ड येथील रहिवासी दीपक किसनाजी गुरनुले (वय ४५) यांचा बजाज कंपनीचा ऑटो (क्रमांक एमएच ४९ ई १४०४) आंबेडकर चौकातून अज्ञात व्यक्तींनी चोरून नेला होता. त्यानंतर हा ऑटो डंकीन रोडवर जाळण्यात आला. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तोंडी तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात ३० ऑक्टोबर २०२६ रोजी अपराध क्रमांक १७१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३२४(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचा तपास करताना पोलिसांनी फिर्यादीकडून माहिती घेतली असता तीन ते चार संशयित इसमांची माहिती मिळाली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असता ते नागपूर येथे आढळून आले.

पोलिसांनी पवन सुनील मोर्या (वय २७, रा. भीमनगर वार्ड), सतीश अनिलराव चिताडे (वय २७, रा. सेंट्रल वार्ड), अक्षय मुरली जयसिंहकर (वय २५, रा. भीमनगर वार्ड) आणि प्रद्युम्न विजय आझाद (वय २७, रा. भीमनगर वार्ड), सर्व हिंगणघाट येथील रहिवासी, यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी एक लाख रुपये किमतीचा बजाज ऑटो आंबेडकर चौकातून नेऊन डंकीन रोडवर जाळल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक आणि हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

डी.बी. पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नायक राजेश शेंडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे, मंगेश वाघमारे तसेच सायबर सेल वर्धा येथील पोलीस हवालदार अक्षय राऊत व गोविंद मुंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88