हिंगणघाट पोलिसांनी जप्त केली लाखोंची अवैध दारू; पंकज काळे विरुद्ध गुन्हा दाखल
हिंगणघाट (दि. 16/01/2026) – हिंगणघाट पोलिसांनी महात्मा फुले वार्डातील पंकज काळे यांच्या घरावर छापा मारून अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला. पोलिसांच्या कारवाईमुळे एकूण 12 लाख रुपयांच्या आसपासचा साठा जप्त करण्यात आला आहे. पंकज काळे यांच्या विरोधात अवैध दारू साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मुखबिरांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पंकज काळे यांच्या घरावर झडती घेत विविध देशी व विदेशी दारू ब्रँड्सच्या 21,000 बाटल्या जप्त केल्या. यामध्ये विके, टँगो पंच, कोकण, भिंगरी, रॉयल स्टँग आणि ओल्डमन अशा ब्रँड्सचा समावेश आहे. एकूण साठ्याची किमत 12,06,600 रुपये आहे.
सदर कारवाई हिंगणघाट पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक राऊत यांच्या आदेशानुसार, सपोनि पद्ममाकर मुंडे, दिपक वानखडे आणि गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अधिकारी – हवालदार प्रशांत ठोंबरे, पोहवा किशोर कडू, जगदीश चव्हाण, सुनिल मेंढे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे आणि रोहीत साठे यांनी ही कारवाई केली.
पंकज काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Good job
ReplyDelete